न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाला अद्याप सर्वसाधारण सभेच मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी विशेष सभा सोमवारी (दि.१ जून) दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केंद्र व राज्य शासनाचा निधी धरून एकूण ६ हजार ६२७ कोटी ९९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प तयार करून तो स्थायी समितीसमोर १७ फेब्रुवारीला सादर केला. स्थायी समितीचे तत्कालिन अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी सदर अर्थसंकल्प स्वीकारत २७ फेब्रुवारीला त्याला विशेष समेत मंजुरी दिली. मात्र, अर्थसंकल्पास सुमारे ७०० कोटींच्या एकूण ६ उपसूचना दिल्या.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली. परिणामी, ३१ मार्चपर्यंत अर्थसंकल्पास मंजुरी मिळाली नाही. ना त्यामुळे आयुक्तांनी सादर केलेला अर्थसंकल्प पालिका प्रशासनाने लागू केला. लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार बंद असल्याने राज्य शासनाने सर्व महापालिकांना एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ ३३ टक्के खर्चास मंजुरी दिली आहे. अर्थसंकल्पला मंजुरी देण्यासाठी विशेष सभा १ जून रोजी आयोजित केली आहे. त्यात स्थायी समितीने सुचविलेल्या सर्व कामे स्वीकारले जातात की नाही हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.
१ जूनला दुपारी दीडला २० मे ची तहकूब सभा होणार आहे. संचारबंदीमुळे पालिका सर्वसाधारण सभा घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. पालिकेचे एकूण १३३ नगरसेवक आहेत. सभा कामकाजासाठी किमान ४३ नगरसेवकांची उपस्थिती आवश्यक आहे. रविवारी (दि. ३१) लॉकडाऊन चौथा टप्पा संपणार आहे. त्यानंतर संचारबंदीत शिथिलता मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे १ जूनची पालिका सभा सोशल डिस्टन्सिंग ठेवून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एका बाकावर दोन जण याप्रमाणे सभागृहात ८० नगरसेवक बसतात. प्रेक्षक गॅलरीत २० नगरसेवक बसू शकतात. सभागृहात खुर्च्या लावून इतर नगरसेवकांची सोय केली जाऊ शकते. तर सर्व अधिकारी सभागृहाबाहेर बसतील. या संदर्भात महापौर उषा ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी सभागृहाची पाहणी केली. सर्व महापालिकांना एकण अर्थसंकल्पाच्या अर्थसंकल्पात काही बदल केले जाऊ शकतात.