न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. जुलै. २०२०) :- पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दत्तवाडी, स्वारगेट, कोथरूड या भागात साठहून अधिक घरफोड्या केलेल्या दोन अट्टल आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
त्यांच्या ताब्यातून चार चाकी गाड्या, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण साडे दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. रवीसिंग कल्याणी आणि युवराज मोहिते अशी या घरफोड्यांची नावे आहेत. हे दोघेही पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती.