न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२०) :- झिरो टॉलरन्स मोहीमेंतर्गत शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाया केल्या जात आहेत. पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांना अवैध धंद्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी जायका चौक मालाश्री हॉटेल समोरील बिल्डींग मध्ये, दुसऱ्या माळ्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी (दि. १९) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास छापा टाकला.
या कारवाईमध्ये दोन लाख ९९ हजार ८०० रुपयांची रोकड आणि एक हजार ५७५ रुपयांचे ३५ पत्त्यांचे कॅट असा एकूण तीन लाख एक हजार ३७५ रुपयांचा ऐवज जप्त केला.
अनिता परमानंद तखतवानी (वय ४७), परमानंद चतुरमल तखतवानी (वय ४८, दोघे रा. जायका चौक जवळ, पिंपरी), विशाल सांताराम कांबळे (वय ४०, रा. सुबेदार रामजी आंबेडकर नगर, डिलक्स चौक, पिंपरी), महेश रामचंद कुरेसा (वय ४२, रा. पिंपरी मेन बाजार, पिंपरी), सचिन जगदीश सौदे (वय २५, रा. विजय नगर, काळेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.