- शहरात गोमातेला वंदन करून वासुबारस साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२०) :- दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई – म्हशी कोणाच्या, राम लक्ष्मणाच्या… अशी पारंपरिक गाणी म्हणत गुरुवारपासून दीपोत्सवाची सुरवात गाय – वासराच्या पूजनाद्वारे होत आहे. यावर्षी दिवाळी सणावर कोरोनाचे सावट असल्यामुळे विविध सामाजिक संघटनांचे गो पूजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळपासूनच बाजारपेठेत आकाशदिवे, पणत्या, लायटिंग, लक्ष्मीपूजनासाठी देवीच्या मूर्ती खरेदीसाठी करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. शुक्रवारी धनत्रयोदशी, शनिवारी नरक चतुर्दशी- लक्ष्मीपूजन, रविवारी निज अश्विन अमावास्या, गोवर्धन पूजन, सोमवारी भाऊबीज, बलि प्रतिपदा, पाडवा आहे.
यंदा कोरोनाच्या संकटामुळे दिवाळी पहाटचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून दिवाळी पहाटचे कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर दिवाळीच्या दिवसात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम देखील रद्द झाले आहेत. त्यामुळे यंदा दिवाळी घरच्या घरी साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे.घरोघरी दिवाळीची तयारी पूर्ण झाली आहे. घरावरती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आकाशदिवे, लाईटिंग लावण्यात आली आहे.