न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२०) :- मेट्रोच्या १० मीटर उंच पोलवरून पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ससून रस्त्यावरील बंडगार्डन मेट्रो स्टेशन येथे घडली. याप्रकरणी साईट इनचार्जवर कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अभिनंदनकुमार नंदकिशोर रमाणी (२३, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मनिषा टुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विनयकुमार सिंग (४२, रा. टिंगरेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ससून रस्त्यावर न्यू सुजाता हौसिंग सोसायटीसमोर मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे.
येथे पिलर क्रमांक आठवर १० मीटर उंचीवर रमाणी हा पिलरला नटबोल्ट बसवण्याचे काम करत होता. येथे कामगार काम करत असताना सुरक्षेच्या दृष्टीने अथवा इतर कोणतीही सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. काम करत असतानाच रमाणी याचा जाऊन तो १० मीटर उंची खाली पडला. यामध्ये जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक शेंडगे करीत आहेत.