न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२०) :- रहाटणीतील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या वतीने कोरोना तपासणी आयोजित करण्यात आली.
यावेळी पिं.चिं.म.पा हॉस्पिटल पिंपळे सौदागरचे डॉ. प्रफुल्ल तपशलकर, डॉ. करुना हराळे, सिस्टर अश्विनी भाक्रे, सिस्टर शितल मगरे, लॅब टेक्निशन सुष्मा खंडारे, डेटा ऑपरेटर आकाश पांचाळ, पंकज गवळी, शैलेश भगत यांच्या निगरानीत कोरोना तपासणी करण्यात आली. तसेच संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका कल्पलता डिक्रुज, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.
राज्य सरकारच्या आदेशानुसार २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरु होणार होत्या, परंतू वाढत्या रूग्णसंख्येमुळे निर्णय बदलण्यात आला असून डिसेंबरमध्ये शाळा सुरु करण्याचा विचार लक्षात घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या वतीने पुर्वतयारी म्हणुन मुख्याध्यापिका कल्पलता डिक्रुज व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोरोना चाचणी (RT-PCR) करण्यात आली. तसेच, संपूर्ण शाळा सॅनिटाईझ करण्यात आली.
“दिवाळीच्या सुट्टीमध्ये नागरिकांमध्ये हलगर्जीपणा वाढत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे. आताच्या कोरोना पार्श्वभूमीवर सोशिअल डिस्टंसिंगचे नियमांचे पालन करून, जास्तीत जास्त टेस्ट करून घेण्याचे गरजेचे आहे. संसर्गग्रस्त व्यक्तीचे संपर्क शोधणे महत्वाचे आहे. कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी एखादी कमिटी स्थापन केली पाहिजे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात कोणाला लस द्यायची, लसीकरण करण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात आल्या पाहिजे,” असे मत संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी व्यक्त केले
शिक्षिका वैशाली काळे यांनी सुत्रसंचालन तर, डॉक्टर व त्यांच्या संघांचे शिक्षिका सिल्वेनिया जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आभार मानले.