- तिघांवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जानेवारी २०२१) :- विनापरवाना रस्ता खोदून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार शनिवारी (दि. ९) कस्पटेवस्ती, वाकड येथे घडला. उमेश राजू इंगळे (३४, रा. धनकवडी, पुणे), अश्विन मारुती खोंडे (३५, रा. कलवडे वस्ती, लोहगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ हंडाळ यांनी शनिवारी (दि. ९) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी वाकड येथील कस्पटे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन मीटर लांब आणि तीन मीटर रुंद खोदकाम केले.
खोदकामात निघालेला मातीचा राडारोडा रस्त्यावर टाकून आरोपींनी वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.