न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे तसेच स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांचे प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विधी समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समिती सभापती सोनाली गव्हाणे, जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, महिला व बालकल्याण समिती सभापती चंदा लोखंडे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सविता खुळे, निर्मला गायकवाड, सुनिता तापकीर, शारदा सोनवणे, सारिका सस्ते, अश्विनी जाधव, कमल घोलप, निर्मला कुटे उपस्थित होते.