- अशी कामगिरी करणारे ठरले देशातील पहिलेच अधिकारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२१) :- आयर्न मॅन किताब पटकविल्याबद्दल पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनमध्ये नोंद करण्यात आली आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडनचे सचिव अनुराग पांडेय, डॉ. प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते कृष्ण प्रकाश यांना मंगळवारी (दि. १९) प्रमाणपत्र देण्यात आले.
आयपीएस आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरीमधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे आयुक्त कृष्ण प्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत. ब्रिटीश संसदचे सदस्य वीरेंद्र शर्मा, आलोक शर्मा, वर्ल्डबुक ऑफ रेकॉर्डस्इंग्लंडचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकुल व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् इंग्लंडचे भारतातील अध्यक्ष तथा दिल्ली उच्च न्यायालयातील वकील अॅड. संतोष शुक्ला आदींनी आयुक्त कृष्ण प्रकाश यांना हा बहुमान मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.