- ४५ अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने रहाटणी येथील परिसरात अनधिकृत बांधकामविरोधी नुकतीच कारवाई करण्यात आली. या परिसरात ११ हजार २१५ चौरस फुटांच्या ४५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
रहाटणी येथील रस्ता रुंदीकरणामध्ये येणारी अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, ओटे यावर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी वाकड पोलिस ठाण्यांतर्गत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अतिरीक्त आयुक्त अजित पवार, सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता सुनील भागवानी, उपअभियंता नितीन निंबाळकर यांच्या उपस्थित ३ जेसीबी, १ ट्रक्टर ब्रेकर, १५ मजूर व १५ महापालिकेचे कर्मचारी यांच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली.