- चिंचवड पेट्रोल पंपालगत मोदींचा फलकाद्वारे उपाहासात्मक निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. मार्च. २०२१) :- केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने पेट्रोल व डिझेल सोबतच केलेल्या भरमसाठ गॅस दरवाढीला विरोध करत पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस च्या वतीने आज अनोखे फलक आंदोलन करण्यात आले.
चिंचवड चौकातील पेट्रोल पंपा लगतच मोदींचा फलका द्वारे उपाहासात्मक निषेध करण्यात आला यात युवक काँग्रेस कडून उभारण्यात आलेल्या फ्लेक्स वर मोदींना गांधीजींच्या तीन माकडां प्रमाणेदर्शविण्यात आले व महागाई च्या या भयानक सद्य परिस्थिती वर मोदींचे मौन, डोळेझाक व दुर्लक्ष याची तुलना करुन निषेध फलकाद्वारे दर्शविण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस सोशल मिडीया विभागाचे अध्यक्ष आयुष मंगल,कष्टकरी कामगार पंचायतीचे नेते प्रल्हाद कांबळे, युवक काँग्रेस चे शहर सरचिटणीस शंकर ढोरे, विरेंद्र गायकवाड, अनिल सोनकांबळे, मिलिंद बनसोडे, अलोक लाड, विशाल सरवदे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, अर्णव कामठे, तेजस पाटील, ओंकार पवार,प्रविण जाधव, पांडूरंग वीर, रोहीत सोनावले आदि पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी गॅस दरवाढी विरोधात, भाजपा विरोधात व मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.