न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी बुधवार दि. ७ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन घोषित केला आहे. याला पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे.
या लॉकडाऊन विरोधात आज बुधवारी दुपारी १ वाजता पिंपरी कॅम्प मेन बाजार येथे सर्व व्यापारी पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून आंदोलन करणार आहेत.