- विद्यार्थ्याला शाळेत हजर राहण्यासाठी पालकांची समंती आवश्यक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२१) :- राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्या धर्तीवर शहरातही शाळा व्यवस्थापनासह महापालिकेचीही लगबग सुरू आहे.
शहरात एकूण ३ लाख विद्यार्थी आहेत. वर्गखोली तसेच स्टाफ रूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था शाळांना करावी लागेल. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी वरील विषयी चर्चा करावी. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मूल्यांकनाकरिता विशिष्ठ योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी तयार करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करूनच शहरातील शाळा सुरू करण्यात येतील. शाळेच्या गेटवर टेम्परेचर गण, सॅनिटायझर आदी गरजेच्या वस्तू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालकांच्या संमतीपत्राशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार नाहीत.
– संदीप खोत, उपायुक्त शिक्षण विभाग, महापालिका…