न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२२) :- फोर्ड कंपनीची एमएच १४ जेए ०१११ या क्रमांकाची फिर्यादीची इंडीव्होर गाडी आहे. फिर्यादीच्या या गाडीचा वाहन क्रमांक आरोपीने त्याच्या चारचाकी वाहनांसाठी वापरला. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी आरोपीच्या गाडीवर दंडात्मक कारवाई केली. त्या दंडाच्या दोन हजार रुपये रकमेचे चलन फिर्यादी यांना मिळाले. फिर्यादी यांना ते चलन भरायला लावून आरोपीने त्यांची फसवणूक केली.
अक्षय भीमा बोबडे (वय २७, रा. यमुनानगर, निगडी) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. २९) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गाडीच्या फोटोंवरून आरोपीच्या वाहनाचा शोध घेण्यात आला. त्यानुसार कारवाई करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
शैलेश मधुकर धरपाळे (वय ३४, रा. डोंगरवाडी, लोणावळा, ता. मावळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पिंपरी येथे २२ जानेवारी ते २८ एप्रिल या कालावधीत हा प्रकार घडला. पोलीस हवालदार अभिजित कुंभार तपास करीत आहेत.