न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२२) :- फोनवरून आरोपीने फिर्यादी यांना संपर्क करून पिंपळे सौदागर येथील शिवार चौक येथील विनगेट वाईन्स या दुकानातील दारू घरपोच देतो, असे आमिष दाखवले.
फिर्यादीकडून प्रथम ८६४ रुपये, नंतर ७० हजार ८३८ रुपये घेतले. त्यानंतर हे पैसे परत करतो असे आमिष दाखवून पुन्हा तीन टप्प्यात ४८ हजार, ४८ हजार आणि ९६ हजार रुपये काढून घेतले.
आरोपीने फिर्यादी यांची ऑनलाईन माध्यमातून एकूण २ लाख ६३ हजार ७०२ रुपयांची फसवणूक केली. ही घटना १५ मे रोजी घडली. चंद्रशेखर दिवाकर सोमकुंवर (वय ४२, रा. पिंपळे सौदागर) यानी गुरुवारी (दि. २६) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7815049265, 8328869022 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.