न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२५) :- चऱ्होलीतील वडमुखवाडी येथे संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेट स्थळी उभारलेल्या ६० मीटर (२०० फूट) उंचीच्या भव्य ध्वजस्तंभावरील ध्वजपताका दिनांक १५ ऑक्टोबरपर्यंत उतरविण्यात येणार आहे.
पावसाळ्यात होणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे ध्वजपताकेला फाटण्याचा व नुकसान होण्याचा धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी दिली.
१८.३ मीटर x १२.२ मीटर (४२ फूट x ३४ फूट) आकाराची ही ध्वजपताका वारकरी संप्रदायासाठी महत्त्वाची मानली जाते. मात्र, वाऱ्याच्या धोक्याचा विचार करून सुरक्षिततेसाठी ती तात्पुरती उतरविण्यात आली आहे. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा ध्वजपताका औपचारिकरित्या फडकविण्यात येईल, असे महापालिकेच्या स्थापत्य विभागाने स्पष्ट केले आहे.













