न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनिमित्त गुरुवार (दि. ३०) रोजी मधुकर बच्चे युवा मंच व भाजपा केशवनगरच्या वतीने आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील व गुरुद्वाराजवळील झोपडी परिसरात राहणाऱ्या गरिबांना मिठाई व कपड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य:मधुकर बच्चे, भाजपा महिला मोर्चा सोशल मिडीया प्रमुख व मीडिया सेल प्रमुख:कोमल काळभोर, केमिस्ट असो अध्यक्ष संतोष खिवंसरा, भाजपा रोजगार आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सौरभ शिंदे, युवा अध्यक्ष:गणेश बच्चे, राजू कोरे, राफेल पगारे, अभिजित पवार आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
काळभोर व बच्चे म्हणाले की, या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे प्रश्न, अडचणी समजून घेतल्या. लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनविषयी माहिती दिली. तसेच या झोपडीत राहणाऱ्या लोकांनी मोदींच्या विषयी आपल्या आदरयुक्त भावना व्यक्त करून, ‘भारत माता की जय’ अश्या उस्फुर्त घोषणा दिल्या.











