न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- राज्यात औषधांची ऑनलाईन खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असून, त्यामुळे शासनाला कोटयावधीच्या महसुलापासून वंचित राहावे लागत आहे. तर दुसरीकडे औषध विक्रेत्यांवर बेकारीचे संकट ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे. कंपन्यांमधून ही औषधे विकेत्यांपर्यंत पोहोण्यापूर्वीच आतील दलाल ही औषध खासगी वेबसाईटला विक्री करून त्यातून पैसे कमावत असल्याचा आरोप पुणे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक तापकीर यांनी केला आहे.
केमिस्टकडून आलेल्या तक्रारीनुसार तापकीर यांनी ॲमेझॉन कंपनीच्या संकेतस्थळावरून (दि. २४ मे २०१९) रोजी गर्भपाताचे किट मागविले. डॉक्टरांची कोणतीही चिट्ठी नसताना तसेच इतर कोणतीही कागदपत्रे नसताना २९ मे रोजी कुरियरद्वारे हे किट त्यांच्यापर्यंत पोहचले. या किटसह केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिका-यांनी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस. बी. पाटील यांच्याकडे घाव घेतली.
तसेच संबंधित कंपनीवर या कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी केमिस्ट असोसिएशनचे खजिनदार रोहीत करपे, परविंदरसिंग बाध, स्वप्नील जंगम, सुभाष गाडे, संदीप सूर्यवंशी, म्हाळप्पा दूधभाते, विनित कलाटे, अजित परमार, तेजस साळवी, गणेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.











