न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १७ ऑक्टोबर २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकक्षेतील (तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या हद्दीतील) एकूण ४६ भूखंडाचे ई-लिलाव करण्यात येणार आहे. ८० वर्षाच्या कालावधीकरिता भाडेपट्टयाने ई-लिलाव होत असून नोंदणी व निविदा दस्तऐवज दि. १६/१०/२०२५ पासून दि. ३०/१०/२०२५ पर्यंत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.
या भूखंडामध्ये शैक्षणिक वापराचे ३ भूखंड, वाणिज्य व सार्वजनिक सुविधेचे ११ भूखंड, वैद्यकीय वापराचे १ भूखंड, सार्वजनिक सुविधा (लायब्ररी / संगीत शाळा) १ भूखंड, (Facility Center) १ भूखंड आणि सुविधा भूखंड (Amenity Space) २९ भूखंड असे एकूण ४६ भूखंड यांचे ८० वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्टयाने ई-लिलावाव्दारे वाटप होणार आहे.
तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीधारकांची घोषणा दि. ०६/११/२०२५ रोजी करण्यात येणार असून दि. ०७/११/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता संकेतस्थळावर ई- लिलाव प्रक्रिया सुरु होणार आहे. सदर ई- लिलाव प्रक्रियेसंबधी सूचना सविस्तर अटी व शर्तीचे माहितीपुस्तिका https://eauction.gov.in व https://pmrda.gov.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत.