- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘दिवाळी पहाट’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत अकादमीतर्फे आयोजित ‘दिवाळी पहाट २०२५ – दीपबंध सुरांचा’ हा संगीतमय सोहळा आकुर्डीतील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात उत्साहात पार पडला.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात गायक-वादकांच्या सुरेल प्रस्तुतींनी रसिकांना भावविभोर केले.
गायक कोमल कृष्णा, राजेश्वरी पवार, विनल देशमुख, गणेश मोरे यांनी मराठी-हिंदी गीतांनी रंग भरले, तर वादक नितीन खंडागळे, सुबोध जैन, दीपक काळे, शाम चंदनशिवे, सागर घोडके यांच्या वादनाने वातावरण भारावले.
कार्यक्रमादरम्यान ‘मिस अर्थ इंडिया २०२५’ विजेती कोमल चौधरी हिचा सन्मान महापालिकेतर्फे करण्यात आला. त्या भारताचे प्रतिनिधित्व जागतिक ‘मिस अर्थ’ स्पर्धेत करणार असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.