न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२५) :- भारताचे माजी (पहिले) केंद्रीय शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी भारतरत्न, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे, नगररचना विभागाचे सह संचालक प्रशांत शिंपी,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते अझिज शेख,अझहर खान,रफीक कुरेशी, हाजी याकुब,आयान शेख, ॲड गणेश मसलेकर, जावेद शहा,रोहन रोकडे, समरीन कुरेशी तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी उपस्थित होते.
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.त्यांनी त्यांच्या जीवनात शिक्षण,विज्ञान आणि राष्ट्रीय एकता यांना महत्त्व दिले. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे ही मौलाना आझाद यांची भूमिका आजही तितकीच महत्त्वाची आहे. त्यांच्या व्यापक विचारांतून शिक्षण क्षेत्रात नवे परिवर्तन घडविण्याची प्रेरणा मिळते.












