- अरुण पवार यांच पीएमपीएमएलकडे निवेदन; प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- पिंपळे गुरव ते वायसीएम रुग्णालय, डी. वाय. पाटील कॉलेज, नेहरूनगर व मासुळकर कॉलनी या नागरिकांनी गजबजलेल्या मार्गांवर नवीन बसथांबे समाविष्ट करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अरुण पवार यांनी पीएमपीएमएलकडे केली आहे.
या संदर्भात अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा जनविकास संघाचे श्रीकृष्ण जाधवर व मालोजी भालके यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांना निवेदन दिले. त्यांनी संबंधित अधिकारी सतीश गव्हाने यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
निवेदनात अरुण पवार यांनी नमूद केले आहे की, पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना वैद्यकीय उपचार, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी या प्रमुख ठिकाणी वारंवार प्रवास करावा लागतो. नियमित बस सेवा नसल्याने त्यांना मोठी गैरसोय सहन करावी लागते.
दरम्यान, या मागणीची दखल घेत पीएमपीएमएल प्रशासनाने लवकरच बसथांबे आणि बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले असून, स्थानिक नागरिकांनी या सकारात्मक प्रतिसादाचे स्वागत केले आहे.











