- भाजपकडून मा. स्वी. नगरसेवक विनोद तापकीर यांच्या उमेदवारीला पसंती?..
- तापकीर यांचा अनुभव, कामाची निष्ठा आणि शांत स्वभाव या आहेत जमेच्या बाजू…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 13 नोव्हेंबर 2025) :- ११ नोव्हेंबरला प्रभाग रचना जाहीर होताच पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल अधिकृतपणे वाजले असून, शहरात निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. सर्वच पक्षांचे इच्छुक उमेदवार पुढे सरसावत असून, प्रत्येकजण “मीच जिंकणार” या आत्मविश्वासाने तयारीला लागला आहे.
प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. मात्र या स्पर्धेत विनोद तापकीर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. मागील पंचवार्षिक काळात त्यांनी निवडणूक लढवली होती आणि अत्यंत कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता. तरीदेखील स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना स्वीकृत नगरसदस्य म्हणून कामाची संधी दिली होती, ती त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
प्रशासकीय कामाचा अनुभव, संयमी स्वभाव, जनतेत सहज मिसळण्याची पद्धत आणि काळेवाडीच्या सर्व नागरी प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेण्याची वृत्ती यामुळे तापकीर यांच्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसतो. पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, वीज समस्या आणि प्रलंबित आरक्षण या सर्व किचकट प्रश्नांवर उपाययोजना करणे हे त्यांचे प्रमुख ध्येय असल्याचे ते सांगतात.
“काळेवाडीला विकासाचे रोल मॉडेल बनवणे, येथे प्रलंबित कामे पूर्ण करणे आणि नागरिकांना दिलासा देणे ही माझी जबाबदारी आहे,” असे तापकीर आत्मविश्वासाने म्हणतात.
स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मार्गदर्शन, तसेच आमदार शंकर जगताप यांचा विश्वास मिळाल्याने पक्षातही त्यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे.
पक्षनिष्ठा, लोकांमधील लोकप्रियता आणि काम करण्याची जिद्द पाहता विनोद तापकीर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. “पक्ष मला संधी देईल आणि नागरिकांच्या आशिर्वादाने मी प्रचंड मताधिक्याने विजयी होईल,” असा त्यांना ठाम विश्वास आहे.
















