न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० नोव्हेंबर २०२५) :- चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रतिभा इन्स्टिट्यूट बिझनेस मॅनेजमेंट मधील एमबीए, एमसीएचे विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक वर्ग मिळून 86 जणांनी उस्फुर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. तसेच डॉ . बोरगांवे आदीच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
त्यावेळी प्रा. मनीष पाटणकर, प्रा. गुरुराज डांगरे, प्रा. अश्विनी जोशी, प्रा. तुलिका चतर्जी , समन्वयक दत्तात्रय येवले, विद्यार्थी प्रतिनिधी कृष्णन पाटील, वैभव महाजन, मोरया ब्लड सेंटरचे डॉ. प्रक्षाली गांधी आदींनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.











