- स्वीय सहायकाच्या डॉ. पत्नीची विवाहानंतर अवघ्या दहाच महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या..
- पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे उचलले टोकाचे पाऊल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई-वरळी (दि. 24 नोव्हेंबर 2025) :- भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी वरळीतील बीडीडी चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 22) सायंकाळी घडली. अवघ्या दहा महिन्यांच्या वैवाहिक आयुष्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची प्राथमिक माहिती..
संध्याकाळी सात वाजता अनंत गर्जे घरी असताना गौरी यांनी गळफास घेतल्याचे समजते. वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे.
डॉ. गौरी या केईएम रुग्णालयाच्या दंतवैद्यक विभागात कार्यरत होत्या. मूळच्या बीड जिल्ह्यातील असल्यामुळे स्थानिक पातळीवरही या घटनेबद्दल मोठी चर्चा सुरू आहे.
कौटुंबिक वाद, संशयित अफेअर आणि छळाचे आरोप…
कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार…
- अनंत गर्जे यांचे बाहेरील महिलेशी अफेअर असल्याचा गौरी यांना संशय
- चॅटिंगचे काही पुरावे गौरी यांनी आपल्या वडिलांकडे पाठवल्याचा दावा
- गेल्या काही दिवसांपासून घरगुती वाद वाढत असल्याची माहिती
- सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचा गंभीर आरोप
या सर्व कारणांमुळे त्या मानसिक तणावात गेल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.
‘आमचा विश्वास नाही…’ – मामांचे गंभीर वक्तव्य…
डॉ. गौरी यांच्या मामांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “काल दुपारी एक वाजल्यापासून अनंत आणि गौरी यांचे भांडण सुरू होते. अनंतचे बाहेर संबंध होते, याची तिला माहिती होती. तिने पाहिलेली चॅटिंगही वडिलांकडे पाठवली होती. अनंत म्हणतो की तीने माझ्यासमोर आत्महत्या केली, पण आमचा यावर विश्वास नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा.”
कुटुंबीय पोलिस ठाण्यात बसून न्याय मिळण्याची मागणी करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार “सामान्य लोकांना न्याय मिळत नाही,” अशीही खंत व्यक्त करण्यात आली.
पंकजा मुंडे यांनी सर्व कार्यक्रम रद्द..
घटनेची माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम तत्काळ रद्द केले. अनंत गर्जे यांच्या लग्नाला पंकजा मुंडेंच नव्हे तर प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या.
तपास सुरू…
वरळी पोलिसांनी…
- घटनास्थळी पंचनामा
- मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम
- कुटुंबीयांची बयानं
- पुढील पुरावे तपासण्याची प्रक्रिया
असा तपास सुरू केला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमधूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना संपूर्ण राज्यात चर्चा विषय ठरत असून विवाहानंतर केवळ १० महिन्यांत असा दुर्दैवी शेवट झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.












