(सुरज करांडे :- क्राईम रिपोर्टर)…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. २८ डिसेंबर २०२५) :- व्हेल माशाची उलटी (अँबरग्रिस) विक्री करण्याचा प्रयत्न करताना दोन युवकांना आळंदीत अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १ किलो ३८० ग्रॅम वजनाचा तुकडा जप्त झाला असून त्याची किंमत अंदाजे १ कोटी ३० लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते.
ही घटना २७ डिसेंबर रोजी मरकळ रोड, घोलप वस्ती येथे उघडकीस आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई केली.
आरोपी शुभम अडागळे (२३) आणि अक्षय उर्फ दादया वरनकर (३०) दोघेही आळंदी येथीलच रहिवासी आहेत. ते दोघेही गैरकायद्याने विक्री करण्यासाठी हा पदार्थ घेऊन आले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.












