- कोपरा सभा, पदयात्रा, संपर्क मोहिमांमधून प्रचार शिगेला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० जानेवारी २०२६) :- मतदानाचा दिवस अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्र. २६ मधील उमेदवार ॲड. विनायक गायकवाड, आरती चोंधे, स्नेहा कलाटे व संदीप कस्पटे यांच्या प्रचाराने (दि. ९) कमालीचा वेग घेतला. पदयात्रा, कोपरासभा आणि घरोघरी संपर्क मोहीम राबवून प्रभागाचा कानकोपरा व्यापून टाकला. सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे यांनी या प्रचारफेरीत सहभागी होत मतदारांशी संवाद साधला.
सकाळी पिंपळे निलखमधील कणसे पथ येथून पदयात्रेस प्रारंभ झाला. तेथून शिक्षक कॉलनी, क्रांतीनगर, सोपानराव इंगवले घाट, पिंपळे निलख गावठाण परिसरात उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. अनेक नागरिकांनी प्रभागातील पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दूरवस्था आणि वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष वेधले. या सर्व समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असू, अशी ग्वाही देत उमेदवारांनी भविष्यात करण्यात येणार असलेल्या विकासकामांची माहिती दिली.
“नागरिकांचा विश्वास केंद्रस्थानी ठेऊन, विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन घेऊन निवडणूक लढविली जात आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास, प्रगती आणि सुरक्षित भविष्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. त्यामुळेच नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.”
– स्नेहा रणजीत कलाटे..स्थानिक नागरिकांच्या सहभागातून विकास साधता येईल. नागरी समस्या सोडविण्यासाठी सातत्याने संवाद ठेवला जाईल.”
ॲड. विनायक गायकवाड…“यापूर्वी पायाभूत सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य दिले. आगामी काळात या सुविधांना आधुनिकतेची जोड देण्याचा आमचा प्रयत्न राहील. मेट्रो, सभागृह, खेळाचे मैदान, उद्यान असे नवनवीन प्रकल्प राबवितानाच स्वच्छता, सुरक्षितता आणि हरितकरणावर भर दिला जाईल.”
– संदीप कस्पटे…“आगामी काळात प्रभागातील आरक्षणे विकसित करण्याचे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मुबलक पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याकडे कल असेल.”
– आरती चोंधे…












