- माजी नगरसेविका सुलभाताई उबाळे यांच्या पॅनेलचे पारडे जड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० जानेवारी २०२६) :- नालंदा हौसिंग सोसायटी, बाबासाहेब आंबेडकर वसाहत, सेक्टर क्रमांक २२, निगडी येथील नारी शक्ती महिला मंडळ यांच्यावतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना धनुष्यबाण पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या सुलभाताई उबाळे, शुभांगी बोऱ्हाडे आणि तानाजी शिंदे यांना नारी शक्ती महिला मंडळाने जाहीर पाठिंबा दिला आहे.
महिला सक्षमीकरण, सामाजिक विकास व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कार्य करणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शिवसेना धनुष्यबाण पॅनेलच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी मंडळातील सर्व पदाधिकारी व महिला सदस्य प्रयत्न करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या जाहीर पाठिंब्याच्या पत्रावर अध्यक्ष अश्विनी विजय वाघमारे, उपाध्यक्ष जयश्री भांडेकर यांच्या सह्या आहेत. नारी शक्ती महिला मंडळाच्या या भूमिकेमुळे माजी नगरसेविका सुलभाताई उबाळे यांच्या पॅनेलचे पारडे जड वाटत आहे.
शिवसेनेचे पॅनल निवडून येणार – वाघमारे…
अश्विनी वाघमारे म्हणाल्या, सुलभाताई कायम आमच्या मदतीसाठी येतात. सुलभाताई यांनी यमुनानगरमध्ये खूप चांगला विकास केला आहे. आमच्या भागात यमुनानगर सारखे काम व्हावे आणि त्याच काम करू शकतात, त्यांचा शिवसेनेचा पॅनल निवडून येणार असेही यावेळी वाघमारे आणि भांडेकर यांनी सांगितले.












