- अनुभव, विकासकामे आणि विश्वासामुळे भाजपचा उमेदवार आघाडीवर?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० जानेवारी २०२६) :- महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी प्रभागनिहाय राजकीय समीकरणे स्पष्ट होत चालली आहेत. प्रभाग क्रमांक २७ मधील अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील उमेदवारांचा आढावा घेतला असता, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब त्रिभुवन यांचे पारडे सध्या जड असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बाबासाहेब त्रिभुवन यांच्या विरोधात असलेले उमेदवार राजकारणात नवखे असल्याने त्यांना मोठ्या मतदारसंख्येपर्यंत पोहोचताना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रभागातील मतदारसंख्या ही ५० हजारांहून अधिक असून, एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रभावी संपर्क साधणे हे आव्हानात्मक ठरत आहे.
याउलट, बाबासाहेब त्रिभुवन यांनी मागील पंचवार्षिक कालावधीत तसेच मध्य निवडणुकीनंतरच्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी प्रभागातील प्रत्येक घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. रस्ते, नागरी सुविधा, मूलभूत सोयी-सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले असल्याची भावना मतदारांमध्ये आहे.
त्यांचा शांत, संयमी स्वभाव आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून काम करण्याची पद्धत यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याविषयी विशेष विश्वास निर्माण झाला आहे. शिवाय, प्रभाग क्रमांक २७ मध्ये भाजपला मानणारा मतदारवर्ग मोठ्या संख्येने असल्याने, या पंचवार्षिक निवडणुकीत देखील बाबासाहेब त्रिभुवन पुन्हा एकदा निवडून येतील व प्रभागाचे प्रतिनिधित्व करतील, असे सध्याचे राजकीय चित्र दिसून येत आहे.
स्थिर नेतृत्व, विकास आणि विश्वासासाठी कमळाला मतदान करा, असे आवाहन नागरिकांमध्ये केले जात आहे.












