- प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचार निर्णायक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपाचे उमेदवार हर्षद सुरेश नढे यांनी तरुण नेतृत्वाचा आत्मविश्वास दाखवत प्रचारात आघाडी घेतली आहे. संघटन कौशल्य, थेट संवाद आणि विकासाचा स्पष्ट अजेंडा यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.
भाजपा अधिकृत उमेदवार विनोद जयवंत नढे, कोमलताई सचिन काळे आणि नीता पाडळे यांच्यासह हर्षद नढे हे घराघरांत जाऊन संवाद साधताना युवकांचे प्रश्न, रोजगार, क्रीडा सुविधा आणि परिसर विकासाबाबत त्यांनी ठोस भूमिका मांडत आहेत. महिलांच्या सभांनाही त्यांनी उपस्थित राहून सुरक्षितता व सोयीसुविधांबाबत आश्वासने दिली.
रहाटणीतील जाहीर सभेमुळे भाजपच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले. एकसंध सत्तेमुळे विकासाला गती मिळते, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला. आमदार शंकर जगताप यांनीही विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका स्पष्ट केली. प्रभागात भाजपमय वातावरण निर्माण झाले असून, विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचा सूर नागरिकांत दिसत आहे. स्थिर, विकासाभिमुख आणि सक्षम नेतृत्वासाठी कमळाला मतदान करा, असे आवाहन करण्यात आले आहे.












