- विकासाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका – चंद्रकांत नखाते…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २७ रहाटणी येथील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत नखाते आणि अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेली भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची जाहीर सभा उत्स्फूर्त वातावरणात पार पडली. या सभेमुळे प्रभागात भाजपच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असून, विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
सभेदरम्यान उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत विकासकामे, नागरी सुविधा, सामाजिक कल्याण योजना आणि संघटनात्मक ताकद यावर मार्गदर्शन करण्यात आले. केंद्र, राज्य आणि महापालिकेत एकसंध सत्ता असल्यास विकासाला गती मिळते, असे स्पष्ट करत नागरिकांनी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
चंद्रकांत नखाते यांनी प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता तसेच युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधांबाबत आपली भूमिका मांडली. नागरिकांच्या अपेक्षा समजून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या जाहीर सभेमुळे प्रभागात चंद्रकांत नखाते यांच्या उमेदवारीचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विकास, स्थैर्य आणि सक्षम नेतृत्वासाठी कमळाला मतदान करा, असे आवाहन करण्यात आले.












