न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ सप्टेंबर २०२६) :- थोर अभियंता आणि भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अभियंता दिन साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शहर अभियंता मनोज सेठीया, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, माजी अतिरिक्त आयुक्त प्रविण तुपे, उप आयुक्त अण्णा बोदडे, सिताराम बहुरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्यासह अभियंते, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
विश्वेश्वरय्या यांनी पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन आणि औद्योगिक विकासासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनीही त्यांना अभिवादन केले.

















