न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ नोव्हेंबर २०२६) :- यमुनानगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही काकडा आरती सांगता सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या मंगलमय प्रसंगी ह.भ.प. मंगल महाराज जगताप व ह.भ.प. शशिकिरण गवळी यांच्या उपस्थितीत सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने कीर्तनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या सोहळ्यास नगरसेविका सुलभाताई उबाळे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ उबाळे, पुणे जिल्हा शिवसेना संघटक संतोष सौंदणकर, नगरसेवक बापू घोलप, नगरसेवक उत्तम केंदळे यांच्यासह परिसरातील विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अंकुश जगदाळे, तुकाराम वारंग, गोपाळ अप्पा काळोखे, गणेश इंगवले, मच्छिंद्र महाकाळ, गजानन ढमाले, अरुण बांद्रे, नारायण पाटील, अशोक लोखंडे, अनंत साळवी, अण्णा कुलवडे, बापू राऊत, सुभाष पवार, शशिकला उभे, संगीता टुक्के, प्रतिभा पालकर, नयना पारखे, जनाबाई गोरे, कमल पिसे, कौस्तुभ गोळे, प्रदीप बेळगावकर, राजेंद्र पळसकर आदींनी विशेष सहकार्य केले.

















