- ४५ स्पर्धकांचा सहभाग; किल्ले अभ्यास समितीचे २० वर्षांपासून इतिहास संवर्धनाचे कार्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ नोव्हेंबर २०२६) :- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गड-किल्ल्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने किल्ले अभ्यास समिती, किवळे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय किल्ले बनवा स्पर्धा २०२६ चा बक्षीस वितरण सोहळा ११ नोव्हेंबर रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उत्साहात पार पडला. स्पर्धेत ४५ स्पर्धक व मंडळांनी सहभाग घेतला.
तरुण मावळ प्रतिष्ठानला ‘हिरोजी इंदुलकर सर्वोत्कृष्ट पुरस्कार’, महालक्ष्मी मित्र मंडळाला ‘रेखीव किल्ला पुरस्कार’, तर नाद सह्याद्री मंडळाला प्रथम क्रमांक मिळाला. अनुक्रमे पुरंदर आणि तोरणा किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या. हार्दिक सकट, रौनक गायकवाड, ऋग्वेद तरस, कुणाल बोडके, शिव-शक्ती मित्र मंडळ, वेदांत जयेश कदम, तन्मय कातळे आणि रितिक काळोखे या बाल मावळ्यांचाही सन्मान करण्यात आला.
इतिहास संशोधक डॉ. जी. बी. शहा प्रमुख उपस्थित होते. संस्थापक अलंकार भीमराव साळवे, सचिव युवा शाहीर भीमांशु साळवे, डॉ. अभिस्नेहा साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गेली २० वर्षे कार्यरत आहे. विद्यार्थ्यांसाठी हडसर किल्ला व लेण्याद्री येथे मोफत अभ्यास सहलीचेही आयोजन करण्यात आले.
यावेळी नगरसेविका रेश्मा कातळे, ऐश्वर्या तरस, माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, शाम भोसले, शुभम दांगट, किरण धुमाळ, राजेंद्र तरस, बापूसाहेब कातळे, नगरसेवक नीलेश गुलाब तरस, धर्मपाल ततपाळे, सुधीर तसलं, सुलक्षणा प्रदीप जगताप व सौ. साळवे उपस्थित होते. प्रस्तावना अलंकार साळवे, सूत्रसंचालन रवींद्र कदम, आभार भीमांशु साळवे यांनी मानले. नियोजन उमा साळवे व डॉ. अभिस्नेहा साळवे यांनी केले.

















