- एकजण गंभीर जखमी; लोकांमध्ये दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २५ नोव्हेंबर २०२६) :- पुणे शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. आज बुधवारी दिवसाढवळ्या अत्यंत वर्दळीच्या शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या (कोर्ट) आवारात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.
भरदिवसा न्यायालयाच्या आवारात गोळीबार झाल्याने परिसरातील नागरिक, वकील आणि न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या आवारातच गोळीबाराची घटना घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, यामागे कोणाचा सहभाग आहे आणि घटनेचे इतर तपशील अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.

















