- महापुरुषांच्या पुस्तकांची पाहुण्यांना भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ नोव्हेंबर २०२६) :-विवाह सोहळ्यातील थाटमाटासोबत सामाजिक बांधिलकी आणि संविधानिक मूल्यांचा जागर घडवत अनुराग आणि भारती (हर्षदा) यांचा मंगल परिणय सोहळा पार पडला. या विवाहात उपस्थित प्रत्येक पाहुण्याला भारतीय संविधान, संविधानाची प्रस्तावना तसेच विविध महापुरुषांच्या जीवनकार्यावरील पुस्तके भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
सोहळ्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या छायाचित्रांसह प्रेरणादायी विचार प्रदर्शित करण्यात आले. एलईडी स्क्रीनद्वारेही सामाजिक संदेश देण्यात आले.
माजी महापौर सागर चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. रामकिशन पुरोहित यांनीही वाचनसंस्कृती आणि संविधान जागृतीचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले. राजू माणिक दणाणे यांनी युवा सहकाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. तर नितीन गवळी यांनी संपूर्ण गवळी परिवार, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून सोहळा यशस्वी झाल्याचे सांगितले.
भव्य सजावट, भोजन आणि पाहुणचारासोबत समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारा हा विवाह सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.


















