न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०१९) :- मोहम्मद पैगंबर जयंती दिनानिमित्त जन अधिकार संघटना व पिंपरी चिंचवड सलमानी जमात संघटनेच्यावतीने जुलूस व रॅली काढण्यात आली.
रॅलीत सहभागी सर्व मुस्लीम बांधवाना मौलाना शमशाद हफीज कादरी यांनी महम्मद पैगंबर जयंतीचे महत्व विषद केले. यावेळी संघटनेच्या वतीने सहभागी नागरिकांना बिस्लरी पाणी, बिस्कीट व आदी खाद्य-पदार्थांचे वाटप करण्यात आले. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या सौजन्याने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जुलूस व रॅलीची मोठ्या उत्साहात सांगता झाली.
यावेळी जन अधिकार संघटनेचे अध्यक्ष मजीद शेख, पिंपरी चिंचवड सलमानी जमात संघटनेच्या अध्यक्षा नसीम शेख, एड. सुशीलकुमार डूमने, बी. के. कांबळे, आदी सहभागी झाले होते, अशी माहिती अध्यक्ष मजीद शेख यांनी दिली.