न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०१९) :- स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ६५ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेअंतर्गत राष्ट्रीय अष्टे-डू-आखाडा – हस्तकला ही स्पर्धा धोलपुर, राजस्थान येथे २१ ते २४ ऑक्टोबर, २०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत चिंचवडच्या श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयातील चि. बस्वलिंग शिवाजी मस्कले (इ.८ वी) याने १४ वर्षाखालील मुलांच्या २६ ते ३० किलो वजनगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत ब्राँझ पदक पटकावले.
या चमकदार कामगिरीबद्दल विद्यालयाचे संस्थापक-अध्यक्ष आण्णासाहेब जाधव यांनी या यशस्वी खेळाडूचे मन:पूर्वक अभिनंदन केले आणि भविष्यातील स्पर्धांमध्ये यश मिळविण्याबाबत शुभाशिर्वाद दिले. या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. बाळाराम पाटील यांनीही या यशस्वी खेळाडूचे मिळालेल्या यशाबद्दल कौतुक केले आणि पुढील सरावासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेचे पर्यवेक्षक श्री. दत्तात्रय भालेराव आणि श्री. शब्बीर मोमीन यांनीही बस्वलिंगचे केलेल्या मेहनतीबद्दल आणि मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.