न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०१९) :- काळेवाडीतील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व LBT ENGLISH MEDIUM SCHOOL यांच्या संयुक्त विदयमाने शाळेच्या प्रांगणात भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष, पिं. चिं. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या हस्ते ध्वजाचे पुजन करण्यात आले. तर, डॉ. जगदाळे, मुख्य संचालक वाय.सी.एम. हॉस्पिटल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी आपल्या भारताच्या संविधानाचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमास माजी नगरसेविका अनिता तापकीर, संस्थेचे सचिव सागर तापकीर, मोहन तापकीर संचालक-शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ, राजू पवार, संचालक, शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ, सोमनाथ तापकीर, सामाजिक कार्यकर्ते, ॲड. सतिश घरत, संचालक शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ, शिवाजी तेलंगे, संचालक शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ, आनंद जोशी व्यवस्थापक, पुर्णावादी बँक, ॲड. केशव घोगरे, ॲड. राजेंद्र गोळे, डॉ. मनोहर शिंदे, शेळके मामा, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीत-संगिताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे आयोजन शशिकांत वाखारे सर, मुख्याध्यापक, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विदयालय काळेवाडी, सुञसंचालन बल्लाळ सर यांनी केले तर आभार देव सर यांनी मानले.