न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भूमि आणि जिंदगी विभागाची आज गुरुवारी (दि. ३०) रोजी आयुक्त दालननात पथविक्रेता अधिनियम २०१७ ची अंमलबजावणी करणेबाबत बैठक संपन्न झाली.
या बैठकीस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे , उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अ क्षेत्रिय अधिकारी आशादेवी दुरगुडे, भूमि आणि जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप व इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये पथविक्रेत्यांच्या सद्य स्थितीबाबत आढावा घेण्यात आला. तसेच पथविक्रेत्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत चर्चा करणेत आली. आयुक्त श्रावण हडीकर यांनी पथविक्रेता धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेचे आदेश सदर बैठकीमध्ये दिले.















