न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२०) :- पुण्यातील टाइम्स अँड ट्रेंड्स च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विमाननगर येथील फिनिक्स मॉल या ठिकाणी नुकतेच ‘लाईफ इन पुणे २०२० अँड बियॉंड’ या संकल्पनेवर आधारित ‘इंटिरिअर डिझाईन’ फर्निचरविषयक वास्तुकलेचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केले होते. प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून तयार झालेले घरातील आधुनिक प्रकारचे फर्निचर, टेबल, घड्याळ, वाशबेसिन अशा अनेक प्रकारच्या साहित्यांचा समावेश होता.
चिंचवड येथील टीटीए कॉलेजची विद्यार्थिनी सिद्धी जितेंद्र मोरे हीने बूट अनं जीन्स परिधान केलेला टेबल प्रदर्शनातील ‘इंटिरिअर डिझाईन प्रमींचे लक्ष वेधून घेत होता. सिद्धी मोरे हीने बनविलेल्या इको फ्रेंडली घड्याळ व इतर वस्तूंना प्रदर्शनात आलेल्या ग्राहकांकडून खरेदीसाठी ऑर्डरही मिळाल्या. त्यामुळे अशा प्रकारचे प्रदर्शन विद्यार्थ्यांमधील कला गुण जोपासत, अर्थार्जन मिळवून देण्यातही महत्वाची भूमिका बजाविताना दिसत आहेत.















