न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने पिंपळे गुरव, सांगवी परिसरात बुधवारी (दि. ५) रोजी पवना नदी पात्रालगत असलेल्या ३ अनधिकृत पत्राशेडवर निष्कासन कारवाई केली. कारवाई केलेल्या बांधकामाचे अंदाजे क्षेत्रफळ १०, २२० चौ. फुट होते.
ही कारवाई राष्ट्रीय हरित लवाद, पुणे यांच्याकडील (दि २२ / ०१ / २०१९) च्या आदेशान्वये करण्यात आली. सदर कारवाई बांधकाम परवानगी विभागाचे सहशहर अभियता राजन पाटील व कार्यकारी अभियंता, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग २ प्रभाग मनिष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
सदर कारवाई १ जेसीबी, डम्पर, ८ मजूर, ८ मनपा अधिकारी व कर्मचारी, १० स्थानिक / मनपा पोलीस अधिकारी / कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आली.















