न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- श्री. विनायक भोंगाळे कृषि, जल व पर्यावरण संवर्धन फाऊंडेशनद्वारा (दि. १३) रोजी गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल, गंधर्वनगरी, मोशी या विद्यालयाच्या सभागृहामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक व परीसरातील नागरीकांकरीता कोरोंना संसर्गाबाबत जनजागृती व उदबोधन, मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेस उपस्थित असलेल्या विद्यार्थी, पालक व नागरीकांची तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यशाळेमध्ये डॉ. पवन वाखाडे (रुबी हॉल ) यांनी उपस्थितांना सध्या जगात थैमान घातलेल्या कोरोना विषानूचा संसर्ग होऊ नये व झाल्यास काय खबरदारी घ्यावी याबाबत दृकश्राव्य माध्यमातून मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या मनात असलेल्या विविध शंकांचे निरसन उपस्थित डॉक्टरांनी केले.
या कार्यशाळेस श्री. विनायक भोंगाळे कृषि,जल व पर्यावरण सवर्धन फाऊंडेशनचे अध्यक्ष विनायक भोंगाळे, संचालिका कविता कडू, तसेच प्राचार्य शशिकांत जोडवे, सर्व शिक्षक व आदी मान्यवर उपस्थित होते.













