न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- जपानला जाऊन आलेल्या पिंपरी – चिंचवड शहरातील आणखी एकाला करोनाचा संसर्ग झाला असून, पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरात मिळून करोना रुग्णांची संख्या १६ झाली आहे. आतापर्यंत आढळलेले रुग्ण हे परदेशातून आलेले होते. मात्र, यातील पाच रुग्णांनी परदेशात प्रवास केलेला नाही.
परदेश प्रवास केलेल्या नागरिकांच्या संपर्कात आल्याने पाच रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही प्रशासनासमोर चिंतेची बाब आहे. प्रशासनाने आवाहन करूनही गर्दी होत आहे. जे परदेशी सहली करून आलेले आहेत. त्यातील काही लोक प्रशासनाने घरी थांबण्याच्या व योग्य ती खबरदारी घेण्याच्या दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन आता कठोर पाऊले उचलणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात जमावबंदी लागू करण्याचा विचार सुरू असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.













