न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- देहूरोड परिसरात अय्यपा मंदिराच्या मागील बाजूस डोंगराला आज सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास वणवा पेटला. या वनव्याणे थोड्याच वेळात रोद्र रूप धारण केले. ही आग लांबूनच निदर्शनास येत होती. आगीचे वृत्त कळताच प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, विजय जगताप, अर्चना घाळी, अमोल कानु, विशाल शेवाळे, तेजस सापरिया, समीर चिले, जयेंद्र मकवाना ह्यांनी घटना स्थळी धाव घेतली.
हा विभाग लष्कराच्या अख्यातरीत असल्याने तातडीने त्या ठिकाणी फायर ब्रिगेड व लष्कराची वाहने पोहचली. याबाबत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीने संपूर्ण डोंगर परिसराला व्यापले असल्याने आग विझवण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहे.
या बाबत प्रत्यक्षदर्शी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले.” देहूरोड परिसरातील लष्कर हद्दीतील मुंबई पुणे महा मार्गाजवळ अय्यप्पा मंदिराच्या मागील बाजूच्या डोंगर भागावर सदरचा वणवा पेटलेला होता. ह्या आगीमुळे जवळजवळ १५ हेक्टर पेक्षा जास्त भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला दिसून येत होता. आग डोंगर उतारावर वेगाने पसरत होती. लष्कर परिसर आणि डोंगर भाग यामुळे आग नियंत्रण बंब गाडींनाही तिथपर्यंत पोहचता येण्यास अडचण होत होती. सदरच्या आगीत मात्र शेकडो वृक्ष डोळ्यासमोर जळत असताना अतोनात वेदना होत होत्या. रात्री ७.४५ पर्यंत आग नियंत्रणात आलेली नव्हती”















