न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२०) :- सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेले उद्योजक तसेच आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक डॉ. संतोष बारणे यांनी बांधकाम मजुरांना करोना विषाणूबद्दल माहिती देत, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. योग्य खबरदारी घेऊन करोनापासून आपला बचाव करा, असे आवाहन त्यांनी बांधकाम मजूरांना केले.
कोरोना विषाणूबद्दल नागरिकापर्यंत योग्य जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेसह सर्व ठिकाणी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्वर ग्रुमध्ये काम करणाऱ्या बांधकाम मजूरांसाठी कोरोनाबद्दल माहिती दिली. तसेच सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप करण्यात आले.
उद्योजक डॉ. संतोष बारणे यांच्या या उपक्रमाचा आदर्श इतरांनी घेऊन एक हात मदतीचा दिला तर नक्कीच या संकटावर मात होईल. प्रत्येकाने माणूसकी जपत एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे, असे या उपक्रमातून बारणे यांनी दर्शविले आहे. बांधकाम मजुरांना साहित्य वाटप करताना सिल्वर ग्रुप चे संचालक डॉ. संतोष बारणे, उद्योजक विजय सस्ते, उद्योजक गणेश जाधव आदी उपस्थित होते.












