न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केलेल्या आणखी एका रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने तो करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे आता बारा रुग्णांपैकी दहा रुग्ण ठणठणीत बरे होत घरी गेले आहेत. तर दोन रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या टप्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केलेल्या उपाययोजनामुळे गेल्या १८ दिवसांत पॉझिटिव्ह आढळलेल्या १२ पैकी तीन जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने शुक्रवारी घरी सोडले होते. त्यानंतर उर्वरित ९ पैकी ६ जणांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने रविवारी त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांच्यावर गेल्या १४ दिवसांपासून भोसरीमधील नवीन रुग्णालयात उपचार सुरू होते.


















