- दुष्काळग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप..
- मराठवाडा, अहिल्यानगरमधील दुष्काळग्रस्त गावे आणि आदिवासी पाड्यांवर मदतीचा हात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०२ नोव्हेंबर २०२६) :- वाढदिवसाचा थाटामाट टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून मराठवाडा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावे तसेच आदिवासी पाड्यांवरील गरजू कुटुंबांना मदत करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधव आणि दुर्गम भागातील नागरिकांना अन्नधान्य, दिवाळीचा फराळ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे संकटात असलेल्या कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
याशिवाय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी आमदार गोरखे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये भरीव देणगी देणार आहेत. ‘वाढदिवसावर होणारा खर्च गरजूंपर्यंत पोहोचवणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. संकटात असलेल्या बळीराजाच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. सर्वांनी आपापल्या परीने मदत करून शेतकरी बांधवांची दिवाळी गोड करावी,’ असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले आहे.


















