न्यूज पीसीएमसी नेटवर्क सुरु काही
पिंपरी (दि. १७. जुलै. २०२०) :- बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात एक घोडचूक करण्यात आली आहे. भगतसिंग, राजगुरु यांच्यासह फासावर गेलेल्या तिसऱ्या क्रांतिकारकाच्या नावात ही अक्षम्य चूक करण्यात आल्याचे ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी निदर्शनास आणले आहे.
सुखदेव यांच्याजागी कुर्बान हुसेन फासावर गेले असा उल्लेख करण्यात आला आहे. ब्राह्मण महासंघाने हा मुद्दा उपस्थित केला असून ही सर्व पुस्तके मागे घेऊन संबंधित लोकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.