- माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात पॉझिटीव्ह कोरोना रुग्ण आल्यानंतर त्याचे उपचार झाल्यावर पूर्णपणे बरा झाल्यानंतर, त्याला घरी सोडताना त्याच्या डिशचार्ज कार्डवर तो निगेटिव्ह आहे, असा शिका असावा किंवा तो पुर्णपणे बरा झाला आहे, असा त्याच्यात उल्लेख असावा. रुग्ण पुर्णपणे बरा झाला म्हणून त्याच्याकडे काहीही पुरावा नसतो. त्यामुळे कामगार किंवा कार्यालयीन कमर्चाऱ्यांना ते पूर्णपणे बरे झाले आहेत, याचा काही पुरावा नसल्यामुळे एमआयडीसीतील उद्योजक त्यांना कामावर रुजू करून घेत नाहीत.
कंपन्या व संस्था कामगारांना निगेटिव्ह रिपोर्ट आणा नाहीतर कामावर येऊ नका, असा फतवा काढल्याने कामगार वर्गात मोठया प्रमाणावर निराशा निर्माण झाली आहे. कोरोना रुग्ण पूर्ण बरा झाला. नंतर त्याला तो पुर्ण बरा झाला आहे, हे सिद्ध करता येत नाही. म्हणुन कोरोना पॉझिटीव्ह कामगार बरे झाल्यानंतर त्यांना काहीही पुरावा नसल्यामुळे मोठया आर्थिक व सामाजिक अडचणीला त्यांना सामोरे जावे लागत आहे.
आयुक्त साहेब आपणांस माझी विनंती आहे की, कोरोना रुग्ण पुर्णपणे बरे झाल्यानंतर त्याला तो पुर्ण बरा झाला आहे, हे सिद्ध करता आले पाहिजे. असा काहीतरी पुरावा त्यांना मिळावा अथवा आपल्या अधिकारामध्ये आपण याबाबत कंपन्यांना कामगारांना रुजु करून घेणेबाबत आदेश काढावा, अशी मागणी माजी नगरसेवक तथा शिवसेना युवासेना पुणे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.